पैसा सर्वस्व नाही
सर्वज्ञ बिन्नर [७ ड]
पैसा आपले आयुष्य बदलू शकतो का? आजच्या जगात प्रत्येक व्यक्ती पैशामागे धावत असते. काही लोक तर म्हणतात की पैसाच जीवन आहे. आपण पैशाशिवाय जगू शकतो का? माणूस पैशाशिवाय सुखी राहू शकतो का? पैसा या जगात खूप महत्त्वाचा आहे. पैशाने वस्तू विकत घेता येतात पण आपण सुख व खरे प्रेम विकत घेऊ शकत नाही.पैसे आपल्याला सुखी ठेवू शकत नाही. जर पैसे आपल्याला सुखी ठेवत असते तर मग हे बौद्ध भिक्षुक, संत पैशाविना कसे एवढे सुखी कसे राहतात? पैसा आपल्याला काही प्रमाणात मदत करू शकतो.
आपला खरा प्रश्न आहे की पैसा आपले आयुष्य बदलू शकतो का? याचे उत्तर आहे - हो. पैसे आपले जीवन बदलू शकतात. ते आपल्याला लागणाऱ्या वस्तू देऊ शकतात. पण जर आपण मेहनतीने ते पैसे कमावले नसेल तर आपल्याला आनंद किंवा समाधान कसे होईल? तर पैसा चांगला आहे पण तो अत्यंत आवश्यक नाही. माणसाला जगण्यासाठी जास्त पैशाची गरज नसते. थोड्या किंवा कमी पैशातही आपण आनंदी राहू शकतो, आपले जीवन जगू शकतो. पैसा हेच सर्वस्व नाही.
प्लास्टिक मुक्त भारत
रिया डिकॉस्टा [७ स]
आज भारत देशच नाही तर संपूर्ण जगात प्लास्टिक चर्चेचा विषय बनला आहे. वाढत्या प्रदूषणात प्लास्टिकचा मोठा वाटा आहे.
प्लास्टिकच्या उपयोगाला वेळीच आळा घातला नाही तर भविष्यात मानवी जीवन मोठ्या सकंटात येईल. आपल्या देशाला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अनेक गोष्टी करता येतील जसे - प्लास्टिक पिशवीचा कमीत कमी उपयोग करावा. भाजीपाला, किराणा आणण्यासाठी कागदी व कापडी पिशवीचा वापर करावा. कार्यक्रम लग्न समारंभात प्लॅस्टिकची ताट वापरली जातात त्याऐवजी आपण पारंपारिक केळीची पाने वापरू शकतो. शक्य तेवढा प्लास्टिकचा वापर कमी केला तर प्लास्टिकची समस्या आपोआप कमी होईल.
भारत सरकारने ‘प्लास्टिक मुक्त भारत’ या अभियानाची सुरुवात २ ऑक्टोबर २०१९ ला मोठ-मोठ्या शहरांमध्ये केली. सुरवातीला आग्रा, मुंबई, हैदराबाद, लखनऊ या शहरांमध्ये प्लास्टिक बंदी सुरू केली. नतंर हे अभियान संपूर्ण देशात पसरले पण आजही अनेक लोक प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.
एक सर्वेनसुार लक्षात आले की भारतात प्रति दिन १६००० टन प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती होते. हा प्लास्टिक कचरा नद्या, तलाव व परिसराला प्रदुषित करतो. प्लास्टिक स्वच्छ पाण्याला दूषित करते. कधी-कधी प्लस्टिक पोटात गेल्यामुळे जनावरांना पोटशूळ उठते. रोग पसरतात.
प्लास्टिकच्या समस्येपासून आपल्याला वाचवण्यासाठी ‘स्वच्छ भारत व प्लास्टिक मुक्त भारत’ या सारखे अभियान यशस्वी करणे आवश्यक आहे. प्लास्टिकच्या विरोधात कठोर कायदे बनवायला हवेत. लोकांना प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगून जागृत करायला हवे तरच आपला देश प्लास्टिक मुक्त होऊ शकतो.
जंगले नष्ट झाली तर…
नील आर्य [७ इ]
वसाहती स्थापनेसाठी, मानवी योजनांना मार्ग देण्यासाठी जंगलतोड केली जात आहेत. यामध्ये दाट झाडे, झुडपे आणि हजारो वर्षांपासून नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या इतर वनस्पतींनी व्यापलेल्या मोठ्या क्षेत्रांचा नाश करणे समाविष्ट आहे. जंगल तोडीचा पर्यावरण आणि इतर संबंधित घटकांवर गंभीर परिणाम होतो. मानवासह पर्यावरणाचा भाग असलेल्या जवळजवळ प्रत्येक नैसर्गिक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो.
सर्वप्रथम जंगलतोडीमुळे जैविक विविधता नष्ट होते ज्यामुळे पर्यावरणीय असंतुलन होते. जैव विविधता म्हणजे ग्रहावरील जीवसृष्टी आणि प्रजातींचे भिन्नता. पृथ्वीच्या जैव विविधता एक चांगला भाग जंगलाद्वारे टिकून आहे कारण मानवी वसाहती मानवासह मर्यादित प्रजाती टिकून ठेवण्यास सक्षम आहेत. जंगल तोडीचा परिणाम केवळ जंगलात राहणाऱ्या प्रजातींवरच होत नाही तर अप्रत्यक्षपणे त्याच्याशी संबंधित असलेल्या प्रजातींवरही होतो. जंगलतोडीचे मानवावर होणारे परिणाम तत्कालीन नसून ते ठराविक काळाने अनुभवले जातात. खराब हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक, अति उष्ण तापमान नैसर्गिक संसाधनांचा अभाव हे जंगल तोडीचे मानवावर होणारे काही गंभीर परिणाम आहेत.
जंगल तोडीमुळे पर्यावरण आणि हवामानावर अनेक नकारात्मक परिणाम होतात. हे संपूर्ण पर्यावरण संतुलन नष्ट करते ज्यामुळे त्याचे अपरिमित नुकसान होते त्यामुळे जंगलतोड राखणे आणि याबाबत आवश्यक उपयोजना करणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे.
Kommentare