जंगलातील वाघोबा
अंश कोपीकर [५ अ]
जगात खूप प्राणी असतात. काही जंगली तर काही पाळीव. लोकांना वेगळे-वेगळे प्राणी आवडतात.
माझा आवडता प्राणी वाघ आहे. वाघ जंगलात राहतात. वाघाचा रंग पिवळा असतो. त्याच्यावर काळे पट्टे असतात. वाघ आशिया खंडातही आढळतात. पांढरे वाघ सायब्रिया जंगलात राहतात. लोक जंगलात जीपमध्ये बसून वाघ बघायला जातात. वाघाचा आवाज खूप मोठा असतो. वाघ दुसर्या प्राण्याची शिकार करून खातो. शहरात वाघ राणीच्या बागेत असतात. वाघ जंगली असला तरी त्याला मारू नये. आपण त्याचे रक्षण केले पाहिजे.
आपला राष्ट्रीय पक्षी
आरना परमार [५ सी]
माझा आवडता पक्षी मोर आहे. मोर हा आपल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो. त्यामुळे त्याचे सौंदर्य अजूनच खुलून दिसते. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे. त्यामुळे इतर पक्ष्यापेक्षा त्याचे स्थान वेगळे आहे. मोराला पावसाची चाहूल सगळ्यात आधी लागते. पाऊस पडायच्या आधी मोर त्याचा पिसारा फुलवून सुंदर नृत्य करतो. त्याचे ते नृत्य पाहण्यासाठी लोक आतुर असतात. मोराची पिसे रंगीबेरंगी असतात. मला मोराची पिसे जमविण्याचा छंद आहे.
हनी माझा गुणी
इरा गिंडे [५ सी]
माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. माझ्याकडे एक कुत्रा आहे. त्याचे नाव हनी आहे. हनी माझ्या घरी राहतो. हनी सोनेरी रंगाचा आहे. तो पेडिग्री खातो आणि पाणी पितो. तो माझ्या बरोबर खूप खेळतो. त्याचे आवडते खेळणे एक बॉल आहे. बसणे, उभे राहणे आणि थांबणे अशा विविध युक्त्या तो करतो. रोज सकाळी मला उठवण्यासाठी तो माझा चेहरा चाटतो. माझी शाळा संपल्यावर तो माझ्याकडे येतो आणि भुंकतो. त्यामुळे मला कळते की त्याला माझ्यासोबत खेळायचे आहे. मला माझा कुत्रा खूप आवडतो.
चपळ प्राणी घोडा
आदित्यवीर दास [५ ड]
माझा आवडता प्राणी घोडा आहे. तो शाकाहारी प्राणी आहे जे गवत, औषधी वनस्पती आणि काही भाज्या खातात. घोडे मानवांशी मैत्री करू शकतात, कारण ते सामाजिक प्राणी आहेत. ते त्यांच्या भव्य आणि वेगासाठी ओळखले जातात. घोडयांच्या पायाच्या टोकाला खूर असतात. त्यामुळे ते जोरात धावू शकतात. घोड्याचे पाय लांब आणि भक्कम असतात. घोड्याचे अनेक वेगवेगळे रंग आणि जाती विकसित केल्या आहेत. घोड्यांचे सामान्यत: रंग राखाडी, गडद लाल तपकिरी आणि हलके तपकिरी आहेत. असा हा प्राणी मला खूप आवडतो.
कुकी
संस्कृती मुल्लरपटण [५ इ]
आपण प्राण्यांचा आदर करायला पाहिजे. फक्त आपल्या फायद्यासाठी त्यांच्याकडे पाहू नये. मला प्राणी खूप आवडतात. माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. कुत्रा एक पाळीव प्राणी आहे. माझ्या वाढदिवशी मला भेटस्वरूप मिळाला होता, भेटवस्तू म्हणजे काही सामान नव्हते – कुत्रा होता! माझा कुत्रा एक पिल्लू आहे. त्याचे नाव ‘कुकी’ आहे. ‘कुकीचे केस पांढरे आणि तपकिरी रंगाचे आहेत. कुकी आमच्या घरी राहतो आणि एक छोट्या पलंगावर झोपतो. त्याला चिकन आणि मटण खायला खूप आवडते. पहिल्यांदा जेव्हा माझ्या मैत्रिणी कुकीला भेटायला आल्या होत्या, तेव्हा कुकी मोठ-मोठयाने भुंकायला लागला. रात्री जेवल्यानंतर मी कुकीला खाली चालायला नेते. कुकी एक खूप इमानी कुत्रा आहे. म्हणून कुकी माझा आवडता प्राणी आहे आणि कायमचा तसा राहील. माझा आवडता कुकी!
Comments